Friday, December 3, 2021

नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा फाशी घेण्याचा पर्यंत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या निषेधार्थ एमएससीबी(MSEB) ऑफिस मध्ये मुख्य अभियंता समोर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न .

भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका व शेतकऱ्यांच्या वतीने आज विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्ये सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास विनंती केली की,आज शेतकरी खूप अडचणीत आहे,शेतकऱ्याकडे कुठलेही पिकं सध्या हातात नाही. साखर कारखाने नुकतेच चालु झाल्यामुळे अजून शेतकऱ्याकडे उसाचेही पेमेंट आले नाही.

त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी व साध्य विद्युत कंपनीने प्रति मोटार तीन हजार रुपये भरून घ्यावे,  परंतु वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यानंतर नेवासाचे तहसीलदार  रुपेशकुमार सुराणा उपस्थित झाले. त्यांनी ही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर ती तोडगा न निघाल्याने आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विद्युत कंपनीच्या ऑफिसमध्ये फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील शेतकरी व आंदोलन करते वेळी दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला नाही तर एका माजी लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी प्राण गमावण्याची वेळ आज

नेवासा मध्ये आली होती तरीही गेंड्याचे कातडाचे असणारे या अधिकाऱ्यांना थोडासाही शेतकऱ्याचा कळवळा आला नाही माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी विद्युत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही फोन करून चर्चा केली तरीही त्यावर ती तोडगा निघाला नाही सर्व आंदोलन करते दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ऑफिसमध्येच ठिय्या आंदोलन करत होते नंतर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मध्यस्थी करून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी रोज एक तास वीज चालू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन वीज बिलांची होळी होळी करून आजचे आंदोलन समाप्त करण्यात आले. परंतु येत्या दोन चार दिवसांमध्ये नेवासा तहसील वरती भव्य ट्रॅक्टर मोर्चा नेऊन कृषी पंपाचे वीज आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

आंदोलनाचे वेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, राजेंद्र मते, अशोक टेकणे,बाळासाहेब शिरसागर,इंजीनियर नगरसेवक सुनील वाघ,मनोज पारखे, विश्वासराव काळे, येडूभाऊ सोनवणे,कैलास दहातोंडे, आप्पासाहेब आयनर, दिगंबर गोंधळी,कल्याणराव मते, निवृत्ती जावळे, विशाल धनगर, अण्णापाटील गव्हाणे,रमेश घोरपडे,बाबा डुकरे, राजेश कडू, संभाजी गडाख अरुण चांदगुडे विशाल धनगर सुभाष पवार महिंद्रआगळे दिलीप नगरे बाबासाहेब शिंदे. डुकरे बी.के राजेंद्र जाधव. किरण जावळे बापूसाहेब डिके रमेश घोरपडे. कानिफनाथ सावंत आदी उपस्थित होते.

उमेश चाऊरे आदिनाथ पठारे अरुण निपुंगे रमेश महानुर आदी उपस्थित होते.श्री. मुरकुटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!