Tuesday, November 30, 2021

एसटी कर्मचाऱ्यांचा संप उद्या मिटणार? राज्य सरकारनं कामगारांना दिला ‘हा’ पर्याय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला एसटी कर्मचारी संप आता लवकरच मिटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. दिवाळीच्याही आधीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबतच राज्यातील

नागरिकांना देखील त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संपावर तोडगा काढण्यासाठी आज ‘सह्याद्री’वर परिवहन मंत्री अनिल परब, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासोबत एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये राज्य शासनाकडून कामगारांना एक पर्याय दिला असून त्यावर उद्या अर्थात बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठकीनंतर

त्याविषयीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. “आम्ही या समितीला जी काही माहिती हवी आहे, ती देतो आहोत. सर्व संघटनांना उच्च न्यायालयाने म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार आहे. तोपर्यंत दुसरा काही पर्याय असेल तर आपण द्यावा, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

यात अंतरीम वाढ देणे किंवा निकाल येईपर्यंत इतर काही चर्चा करायची असेल तर तुम्ही त्याचे पर्याय द्यावेत. याबाबत कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. समितीचा जो अहवाल येईल, तो राज्य शासन मान्य करेल हे आम्ही ठरवलं आहे. पण तोपर्यंत हा संप असाच चालू राहू शकत नाही. याबाबत

कर्मचाऱ्यांशी चर्चा सकारात्मक झाली आहे. त्याबाबत उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा निर्णय घेण्यासाठी बसायचं असं ठरलं आहे”, असं अनिल परब म्हणाले.संप मिटावा यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार प्रत्येक पातळीवर प्रयत्न करत आहे.

माझी कामगारांना विनंती आहे, की संप जितका लांबेल, तेवढं कामगार आणि एसटीचंही नुकसान होत आहे. जनतेला त्याचा त्रास होतोय”, असं देखील अनिल परब यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!