Saturday, November 27, 2021

कार चोरुन विक्री करणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलीसांनी केली अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

भाड्याने केलेली गाड़ी चोरुन विक्री करणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलीसांनी पोटादा पोलीसांच्या मदतीने अटक केली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी फिर्यादी दिपककुमार हरिश्चंद्र गुप्ता (वय ३० वर्षे) धंदा ड्रायव्हर रा. सांताक्रूझ मुंबई हे त्यांच्या ताब्यातील स्विप्टकार
क्रमांक एमएच 02 सीआर 7642 ही घेवुन मुंबई येथे असतांना त्यांना जस्टडायल वरुन मुंबई ते औरंगाबाद भाडे आलेने त्यांनी आरोपींच्या मोबाईलवर फोन भाडे सायंकाळी 07.00 वा सुमारास तीन इसमांना गाडीमध्ये बसवुन बांद्रा येथुन औरंगाबाद ठरवुन येथे दि.20 रोजी जात असतांना गाडी अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत हांडीनिमगाव शिवारात 05.00 वा सुमारास फिर्यादीस लघवी आलेने गाडीला चावी ठेवुन लघुशंका करण्यासाठी खाली उतरला असता आरोपीतांनी सदर गाडी चालु करुन घेवुन चोरुन नेली अशा फिर्यादी वरुन नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 888/2021 भादवी 379,34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर यांचेकडील मोबाईल सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करत असतांना तपास करत असतांना सदर आरोपी पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत चोरलेली स्विप्टकार फिरत असले बाबत समजलने त्या ठिकाणी सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोना अशोक कुदळे, पोकों अंबादास गिते, केवल रजपुत, संजय माने अशांनी पाटोदा पोलीस स्टेशन अतंर्गत रायमोह पोलीस दुरक्षेत्र येथुन पाटोदा पोलीस स्टेशन

फडोल पोना एन.ए. माने तसेच पोकॉ जी. व्ही. सानप यांच्या मदतीने आरोपीतांचा शोध घेत असतांना ते गुन्हयात चोरलेल्या स्विप्टकारसह रिजवान मोहम्मद पटयण (वय 30 वर्षे) रा. निरगुडी ता. पाटोदा जि.बीड, महेश रामकृष्ण आघाव (वय 35 वर्षे)रा खांकरमोह ता. शिरूर कासार जि.बीड,वागवान अफताव वागवान रहीमुद्दीन (वय 23 वर्षे) रा प्रकाश आंबेडकर नगर वार्ड क्र 25 बीड व जुबेर मुसा भागवान (वय 21 वर्षे) रा टाफरवन ता. माजलगाव जि. बीड यांना ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपी क्र 01 व 02 यांनी त्याच्या इतर एका साथीदारासह सदरची गाडी चोरुन तो आरोपो क्र 03 व 04 यांना विक्री करत असतांना पकडले आहे.

सदर आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता आरोपीतांना 05 दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे. आरोपीतांकडून अशाच प्रकारे इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार,सपोनि ज्ञानेश्वर थोरात, सपोनि माणिक चौधरी, पोसई नितीन पाटील, पोसई समाधान भाटेवाल, पोना अशोक कुदळे, बबन तमनर, बाळासाहेब कोळपे, पोको अंबादास गिते, केवल रजपुत, संजय माने अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर सायबर सेल यांचेकडील पोना फुरकान शेख तसेच पाटोदा पोलीस स्टेशन कडील पोना एन. माने व पोका जी सानप यांनी केली.
पुढील तपास पोना अशोक कुदळे हे करत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!