Wednesday, December 8, 2021

दारू हवी असेल तर आधी घ्यावे लागतील कोरोना लसीचे दोन डोस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना सारख्या महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण हा एक उत्तम उपाय मानला जातो. राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असलं तरी आणखी अनेकांनी लस घेतली नाही. लसीकरण मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी सरकार आणि प्रशासन

अनेक प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मद्यप्रेमींसाठी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. लस घेतली असेल तरच त्या मद्यप्रेमींना दारू मिळणार आहे. लसीचे २ डोस पूर्ण झाले असतील तरच दारू मिळणार आहे. दुकान विक्रेत्यांना

याबाबत खात्री करण्याचे व नियमांचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी ही धक्कादायक बातमी आहे.दरम्यान , लसीचा डोस घेतला नसेल तर दारूचा विषय सोडा असाच काहीसा हा निर्णय आहे. कारण लसीचा

एकही डोस जर झाला नसेल तर त्यांना दारू विक्री करता येणार नाही. लस घेतली नसेल तर तुम्हाला औरंगाबाद शहर व जिल्ह्यात आता यापुढे दारू मिळणार नाही. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला होता.

यापूर्वी त्यांनी लस घेतली असेल तरच पेट्रोल दिले जाण्याचा निर्णय घेईल होता. विषय निमित्त काहीही असो कोरोना लसीकरण वाढविणे हा या मागचा उद्गात हेतू आहे हे मात्र नक्की. कोरोना लसीकरण करून स्वतः व कुटुंबाला वाचवा हा संदेश

देण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जात असून माझे कुटुंब , समाज माझी जबाबदारी याची जाणीव सर्वांना होणे गरजेचे आहे.लसीकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून आता लवकरच लकी ड्रॉ सुरू केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पहिला डोस अनेकांचा पूर्ण झाला असून, दुसरा डोस घ्यावा यासाठी स्वयंपाकाची भांडी, रोख रक्कम अशा पद्धतीने बक्षीस ही लकी ड्रॉ मधून देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक राज्यांमध्ये

लसीकरणचा आकडा वाढलेला नाही त्यासाठी केंद्र सरकारकडून हे प्रयत्न केले जाणार आहेत.अनेक राज्यात , जिल्ह्यात आजही लसीकरण कमी आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!