Wednesday, December 8, 2021

महाराष्ट्रात पहिली ते चौथीचे वर्ग लवकर सुरू होणार?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. शाळा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी असे शाळांचे वर्ग आधीच सुरू आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

ग्रामीण भागातले शिक्षक, शाळा चालक, पालक अशी सगळेच जण यासाठी आग्रही आहेत. त्यानंतर चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास संमती दिली आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र १२ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.

तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपेंनी हे देखील सांगितलं की , नाट्यगृह, सिनेमागृहांना आता 50 टक्के उपस्थितीसह संमती देण्यात आली आहे. ही परिस्थिती सुधारली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी म्हटलं की, सध्या

लग्नसराईमुळं गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही. बिनधास्तपणा जाणवतोय. ही मानसिकता घातक आहे. जागरूक राहिले पाहिजे. दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आता रोज

सरासरी 700 ते 800 रुग्ण सापडत आहेत. बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के आहे. मुले आजारी पडल्याचं प्रमाण जास्त नाही. पालकांनी चिंता करण्याचं कारण नाही. बूस्टर डोससंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे.

तर त्यांना बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना ते म्हणाले की, त्यांची प्रकृती चांगली आहे. फिजिओथेरपी सुरू आहे. ते पूर्ण करुन कामाला लागावं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!