Monday, November 29, 2021

बापरे:तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महिलांवर आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सतत घडत आहेत. यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी विकृत घटना समोर आली आहे.

कल्याण- पूर्व भागात एका तरुणीने चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी तरुणी एवढ्यावरच न थांबता तिने तर चक्क पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर प्रियकराद्वारे बलात्कार करण्यास भाग पाडले आहे.

कोळशेवाडी पोलीस  ठाण्याच्या हद्दीमध्ये हा धक्कादायक आणि विकृत प्रकार घडला आहे. येथील एका २३ वर्षीय तरुणीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. ही विकृत तरुणी पीडित अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे.

मागील काही महिन्यांपासून ही तरुणी पीडित अल्पवयीन मुलाचे जबरदस्तीने लैंगिक शोषण करत होती. तसेच घटनेची वाच्यता न करण्यासाठी आरोपी तरुणी अल्पवयीन पीडित मुलाला नेहमी धमकावत असत. म्हणूनच मागील काही महिन्यांपासून पीडित मुलाने या घटनेची वाच्यता कुठे देखील केली नाही.

आरोपी तरुणी एवढ्यावरच न थांबता,तिने चक्क आपल्या प्रियकराकडून पीडित अल्पवयीन मुलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर देखील लैंगिक अत्याचार करायला भाग पाडली आहे. या विकृत तरुणीच्या प्रियकराने देखील पीडित अल्पवयीन मुलीवर

सतत लैंगिक अत्याचार केले आहे. या घटनेची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत, अशी धमकी पीडित अल्पवयीन बहीण- भावाला दिली जात होती. यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर येत नव्हता.

अखेर भेदरलेल्या आणि आरोपींच्या अत्याचाराच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित अल्पवयीन भाऊ- बहिणीने मोठ्या हिंमतीने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी कुटुंबीयांना सांगितली आहे. यानंतर नातेवाईकांनी कल्याण पूर्वेमधील कोळशेवाडी

पोलीस ठाण्यात या घटनेविषयी फिर्याद दिली आहे. अल्पवयीन भाऊ- बहिणीवर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी एकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी विकृत तरुण- तरुणी विरोधामध्ये कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोस्को

अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...

नगर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला घरातून नेले पळवून

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अपहरणाची घटना समोर आली आहे. सद्यस्थितीत ही तिसरी घटना आहे. दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याने गुन्हा...

नगर जिल्ह्यातील या डेपोतून 11 बस विविध ठिकाणी मार्गस्थ

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सर्वाधिक शेवगाव आगारातून बस सेवा सुरू झाली होती. मात्र दोन दिवसात तीन बसवर दगडफेक झाल्याने कर्मचारी धस्तावले होते. आज वाढीव पोलीस...

मोठी बातमी:महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? मुख्यमंत्र्यांनी दिला स्पष्ट इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:  कोरोनाचा  धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना...

महाराष्ट्रात पहिली ते सातवी चे वर्ग सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज:1 डिसेंबर पासून राज्यभरातील पहिली सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग कडून जिल्हापरिषद महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या...

राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान गुजरात, महाराष्ट्र, गोवा राज्यांमध्ये अवकाळी...
error: Content is protected !!