Monday, November 29, 2021

राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात भाजपाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.सध्या राज्यातील जनतेचे विविध प्रश्न गंभीर बनले आहेत.

त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. लोक रस्त्यावर उतरत आहेत.मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हे प्रश्न सोडविता येत नाहीत. त्यामुळे लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करून दबाव आणला जात आहे,

असा आरोप विखे पाटील यांनी केला.करोना आणि नैसर्गिक आपत्‍तीमुळे राज्‍यातील जनतेचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. तीन पक्षांच्‍या सरकारला जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यात कोणतेही स्‍वारस्‍य राहिलेले नाही. जनतेचा उद्रेक रस्‍त्‍यावर येवू नये म्‍हणून सरकार फक्‍त जनतेवर

दबाव आणत आहे. प्रश्‍न सोडविण्यापेक्षा जमावबंदी आदेश लागू केले जात आहेत. एसटी कामगार संघर्ष करीत आहेत. आता विजेच्या प्रश्नासाठी गावोगावी रस्त्यावर उतरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. मागील दोन वर्षांच्या

कार्यकाळात या सरकारने राज्यातील जनतेला कोणतीही मदत केली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा सरकारने पाठविल्या आहेत. एसटी कामगार आपल्या मागण्यांसाठी मुंबईतील

आझाद मैदानात बसून आहेत. सरकारच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या फक्त बैठका सुरू आहेत. कामगारांना न्याय देण्याची इच्छाशक्ती महाविकास आघाडी सरकारमध्ये दिसून येत नाही,’ असा आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...

नगर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला घरातून नेले पळवून

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अपहरणाची घटना समोर आली आहे. सद्यस्थितीत ही तिसरी घटना आहे. दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याने गुन्हा...

नगर जिल्ह्यातील या डेपोतून 11 बस विविध ठिकाणी मार्गस्थ

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सर्वाधिक शेवगाव आगारातून बस सेवा सुरू झाली होती. मात्र दोन दिवसात तीन बसवर दगडफेक झाल्याने कर्मचारी धस्तावले होते. आज वाढीव पोलीस...
error: Content is protected !!