Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात नितीन गडकरींचे चरण पुजन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कल्याण – विशाखपट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे सहा वर्षापासून रखडलेले काम त्वरीत पुर्ण करावे यासाठी पाथर्डीत मनसेच्या वतीने आज केंद्रीय भुपृष्ठ रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या चरण पुजनाचा कार्यक्रम करुन अभिनव आंदोलन करण्यात आले.

मेहेकरी ते फुंदेटाकळी पर्यंतच्या 55 कि.मी. महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षापासून रखडलेले आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सुमारे 400 लोकांचे अपघातात बळी गेले आहेत. खासदार, आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

ते सुद्धा या रखडलेल्या कामाबाबत हतबल झाले आहेत.आज अखेर मनसेच्या आयोजित केलेल्या अभिनव आंदोलनासाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दर्शवत यात सहभाग नोंदवला.आज सकाळी पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नाईक

चौकात केंद्रीय मंत्री नितींन गडकरी यांच्या चरणांची मंत्रोपचाराच्या जयघोषात विधीवत पूजा करताना आली.महामार्गाचे काम येत्या पंधरा दिवसात सुरळीत झाले नाही तर नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पुढील उपोषण करुन आंदोलन करणार आहे.

या पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,खासदार डॉ सुजय विखे,आमदार मोनिका राजळे,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे फोटो मनसेचे कार्यकर्ते गळ्यात घालून भीक मांगो आंदोलन करणार आहे.या आंदोलनातील गोळा झालेल्या पैशातून

महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे असा निर्धार यावेळी करण्यात आला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!