Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गुणोरे गावातील ४५ वर्षीय तरूण शेतकऱ्याने शेतामधील लिंबाच्या झाडाला दोरखंडाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघड झाली.

घटनास्थळी निघोज दुरक्षेत्राचे पोलिस दाखल झाले असून पंचनामा करून ते आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रेय किसन खोसे (वय ४५ रा. गुणौरे, ता. पारनेर) असे

आत्महत्या केलेल्या तरूण शेतकयाचे नाव आहे. बुधवारी पहाटे त्यांनी त्यांच्या गुणौरे येथील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुणोरे परीसरातील शेतीसाठी सध्या पहाटेच्या सुमारास विजपुरवठा सुरू करण्यात येतो. खोसे यांच्या घराशेजारील शेतकरी सकाळी कांद्याला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले असता लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दत्तात्रेय यांचा मृतदेह आढळून आला.

त्यांनी दत्तात्रेय खोसे यांचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांना त्याबाबत माहीती दिल्यानंतर घटनास्थळी नागरीक जमा झाले. पोलिसांना माहीती देण्यात आल्यानंतर निघोज दुरक्षेत्राचे पोलिसही तेथे दाखल झाले.

त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आता दत्तात्रेय यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!