Wednesday, December 8, 2021

कोरोना मृतांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत :महसूल मंत्री थोरात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशात मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने हाहाकार मजविला आहे. महाराष्ट्रातील कोरोना मृतांच्या वारसांना राज्य सरकारने प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोविडला राष्ट्रीय आपत्ती घोषित करत देश लॉकडाऊन केला होता. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्तीतील मृतांना 4 लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे. ही बाब एककाळ वकील असलेल्या

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चफखलपणे हेरली आहे. कोविड मृतांना हा आपत्ती निधी मिळविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन महत्त्वपूर्ण बाबी सांगितल्या आहेत.बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, राज्यघटनेने आपल्या

नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक सेवांचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. यासोबतच आपली राज्यघटना प्रत्येक नागरिकाला राज्याकडून त्यांचे घटनात्मक अधिकार प्राप्त करून घेण्याचाही अधिकार देते.

कोविड-19 महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान राज्य सरकारच्या राज्य आपत्ति मदत निधी मधून दिले जावे असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने 11 सप्टेंबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात दिले होते. राष्ट्रीय आपत्ती

व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) अंतर्गत ही रक्कम केंद्र व राज्य सरकार 75 टक्के व 25 टक्के अशी दिली जाते.कोविड-19 महामारीची लागण देशभरात मोठ्या प्रमाणात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्ण बिघडले. अनेकांची आयुष्यभराची कमाई

या महामारीने संपुवून टाकली व असंख्य कुटुंब कर्जबाजारी झाली आहेत. अशा परिस्थितीत केवळ 50 हजार रुपयांची आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करणे सरकारला शक्य नाही असे केंद्र सरकार म्हणते. पण केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांवरील करातून लाखो

करोडो रुपयांची कमाई करते आणि बड्या उद्योगपतींना कार्पोरेट टॅक्समध्ये भरघोस सवलत देते, कोविड पीडितांना मदत द्यायची म्हटले की निधीची अडचण पुढे करते, हे पटत नाही.केंद्र सरकारने कोविड-19 ला एनडीएमए अंतर्गत आपत्ती जाहीर करुन कोरोना

प्रतिबंधासाठी लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लादले. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून भरभक्कम दंड वसूल करण्यात आले. परंतु एनडीएमए अंतर्गत सहाय्य निकषामध्ये 4 लाख रुपये मदतीचे प्रावधान असताना त्याची पूर्तता मात्र केली जात नाही.

एक कल्याणकारी राज्य म्हणून गरजेच्या वेळी आपल्या नागरिकांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 14 मार्च 2020च्या अधिसूचित केलेल्या पूर्वीच्या आदेशानुसार कोविड-19 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये

देण्याच्या केंद्र सरकारच्या वचनाची पूर्तता करावी ही आमची मागणी आहे .एसडीआरएफ निकषांनुसार 4 लाखांपैकी 75 टक्के म्हणजे 3 लाख केंद्र सरकारने भरावे आणि उर्वरित 25 टक्के म्हणजे 1 लाख, राज्य सरकारचा हिस्सा आहे. आपण राज्य सरकारांच्या 1 लाख

सानुग्रह रकमेचा हिस्सा अदा करण्याची हमी द्यावी म्हणजे केंद्र सरकारवर दबाव येऊन ते बाधित नागरिकांबद्दलची त्यांची वचनबद्धता पूर्ण करण्यास प्रवृत्त होईल. याद्वारे आपण आपल्या नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा त्यांचा हक्क देण्यात यशस्वी होऊ, असे थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!