Friday, December 3, 2021

रोहित पवार यांनी जमावबंदी मोडली? नगर जिल्ह्यातील या भाजप नेत्याने केला ‘हा’ गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: करोना काळातील नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम मोडून कर्जत-जामखेड मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीच विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. आतापर्यंत असे तीन वेळा झाले आहे.

त्यामुळे कर्जत-जामखेड वगळून हे नियम आहेत का? तसे नसेल तर तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का?’, असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.अहमदनगर येथे

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कर्जत-जामखेडमधील विविध कार्यक्रमांकडे लक्ष वेधून हा आरोप केला. शिंदे म्हणाले, ‘नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात २२ ते २८ नोव्हेंबरपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितामधील कलम १४४ नुसार

प्रतिबंधात्मक आदेश जारी करून जमावबंदीचा आदेश दिला आहे. असे असले तरी कर्जतमध्ये आमदार पवार यांनी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बंदी आदेश असूनही असा कार्यक्रम कसा घेता येईल? त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाणार का? की

या आदेशातून कर्जत-जामखेडला वगळले आहे? याचा खुलासा प्रशासनाने करावा. आमदार पवार यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी करोना काळातही त्यांनी अनेकदा नियम मोडले आहेत. बंदीचा आदेश लागू असताना खर्डा येथे किल्ल्यासमोर भगवा झेंडा

उभारण्यासाठी मोठा कार्यक्रम घेतला होता. तिन्ही वेळा आमदार पवार यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासनाने यासंबंधीची भूमिका जाहीर करावी,’ अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.करोना काळातही पवार यांच्याकडून

नियम मोडले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. आता पुन्हा एकदा शिंदे यांनी हा आरोप केला आहे. पवार यांच्या पुढाकारातून कर्जतमध्ये आता एक मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी टीव्हीवरील कलाकार उपस्थित राहणार आहेत.

यावरून शिंदे यांनी पुन्हा एकदा पवार यांच्यावर नियम मोडत असल्याचा आरोप करून आता प्रशासनालाच जाब विचारला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!