Friday, December 3, 2021

कोरोनाचा धोका संपलेला नाही; आता चिंता वाढवणारी बातमी समोर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच आता कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने चिंता वाढली आहे.

दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार मल्टिपल म्युटेशनसह हा नवा विषाणू आढळून आला आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजने दिलेल्या माहितीनुसार, वैज्ञानिक या

नवीन कोरोना व्हेरिएंटचे संभाव्य परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जीनोमिक सिक्वेन्सिंगनंतर, असे आढळून आले आहे की आतापर्यंत B 1.1.529 व्हेरिएंटची 22 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. याआधीही दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे काही

व्हेरिएंट आढळून आले होते. गेल्या वर्षी, दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कोरोनाचा बीटा व्हेरिएंट  आढळला होता. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हेरिएंट C.1.2 आढळला होता.

दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने अंदाज वर्तवला होता की हिवांळ्यात 53 देशांमध्ये, कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे आणखी 7 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे WHO ने सतर्क केलं असून कमी प्रतिकारशक्ती

असलेल्या आणि 60 वर्षांवरच्या नागरिकांना तसंच आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यास प्राधान्य दिलं पाहिजे, असं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओने लोकांना खबरदारीचा इशारा दिला असून कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

युरोप आणि मध्य आशियामध्ये कोविड-19 ची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हिवाळ्यात आणखी प्रकरणं वाढू शकतात, त्यामुळे योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!