Saturday, November 27, 2021

पहिले ते बारावी सरसकट सर्व वर्ग सुरु होणार;ही सरकारची नियमावली?शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी या सूचना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांची घंटा आता वाजणार आहे. पहिली ते बारावीपर्यंतची शाळा सुरु करण्याचा निर्णय आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.

त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शाळेल शिक्षण विभागानं मांडला होता. त्याला आज राज्य सरकारनं मान्यता दिलीय. दरम्यान, शाळा सुरु होत

असताना कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नियमावली पाळण्याचं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलंय. त्यासाठी यापूर्वी शाळा सुरु करण्याच्या निर्णयावेळी राज्य सरकारनं दिलेली नियमावली पाळली जावी, असं गायकवाड म्हणाल्या.

शाळा सुरु करण्याबाबत सरकारची नियमावली काय?

> शक्य असल्यास प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनीक सुरु करावं
>> विद्यार्थ्यांचं तापमान नियमीतपणे तपासावं
>> शक्य असल्यास त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी
>> सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात
>> हेल्थ क्लिनीकसाठी स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांची मदत घ्यावी
>> यासाठी लागणारा निधी CSR फंडातून खर्च करावा

विद्यार्थी आणि पालकांसाठी सरकारच्या सूचना

मुलांना शाळेत चालत येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं

ज्या शाळांमध्ये खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात त्या वाहनात एका सीटवर एक विद्यार्थी प्रवास करेल याची काळजी घ्यावी

विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना चालक आणि वाहकांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावं

शिक्षकांसाठीही महत्वाच्या सूचना

जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायजरे हात धुण्याची विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी.

वह्यांची अदलाबदल होणार नाही यासाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं.

वेळ असल्यास शक्यतो गृहपाठ वर्गातच करुन घ्यावा.

सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.

कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाली की खेळ सुरु करायला हरकत नाही तरीही असे खेळ खेळत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी.

खेळाचं साहित्य सॅनिटाईज करावं.

खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेषकरुन दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!