Tuesday, November 30, 2021

संतापजनक नगर जिल्ह्यात:सात वर्षीय अल्पवयीन मुलावर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने केला अनैसर्गिक अत्याचार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील 13 वर्षांच्या मुलासोबत प्रौढ व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटनासमोर आली. आरोपीने लष्करी गणवेश परिधान केलेला होता.

तोफखाना पोलिस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि पोक्‍सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एका

गावात साडे सात वर्षीय अल्पवयीन मुलावर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून १६ वर्षीय मुलाविरोधात घारगाव

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिडीत साडे सात वर्षीय गावातीला जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात खेळत होता. यावेळी तेथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा आला. त्याने ७ वर्षीय मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर

जिल्हा परिषद शाळेलगत बालवाडी असलेल्या बोळीत तो त्याला घेऊन जात तेथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!