Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकींग: मोठा अपघात; तीन भावांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून आलेल्या या वृत्ताने सर्वांच्याच हृदयाचा ठाव घेतला आहे.तालुक्यातील घारगाव या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिल्याने तीन भावांचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात झाल्यानंतर दुचाकीवरील पापा अब्दुल मणियार (वय ३२), अन्सार अब्दुलकरीम मणियार (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्यांचा चुलत भाऊ समीर अहमद मणियार (वय २७, तळेगाव दिघे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मंगळवारी दुपारी २ वाजता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वरुडी फाटा पुलाजवळ हा अपघात झाला.तिघे मोटार सायकल (एम.एच. १२ डी.एफ. १७५८) वरुन बोटा येथे पाहुण्याकडे गेले होते. परत येत असताना त्यांच्या दुचाकीला इनोव्हा कारने धडक दिली.

अपघात होताच कार चालक फरार झाला. जखमी समीरला संगमनेरला कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याचाही मृत्यू झाला.घारगाव पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

 

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!