Wednesday, December 8, 2021

नगरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला सक्तमजुरी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी सचिन तुळशीराम शिकारे (वय 28 रा. धनगरवाडी ता. नगर) याला विनयभंग, पोक्सो कलमान्वये दोषी धरून न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

तसेच याच गुन्ह्यातील आरोपी विकास तुळशीराम शिकारे, सुभद्रा तुळशीराम शिकारे (दोघे रा. धनगरवाडी) यांना भादंवि 323 प्रमाणे दोषी धरून प्रत्येकी एक हजार रुपये दंड, सुभद्रा शिकारे हिला भादंवि कलम 504 प्रमाणे दोषी धरून पाचशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मनीषा पी. केळगंद्रे- शिंदे यांनी काम पाहिले. 29 ऑगस्ट 2018 रोजी अल्पवयीन मुलगी कॉलेजला जाण्यासाठी बस स्थानकावर उभी असताना सचिन शिकारे याने तिचा हात धरून छेड काढली होती.

घडलेला प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर सचिनच्या घरी ते गेले. तेथे असलेल्या विकास व सुभद्रा शिकारे यांनी मुलीसह तिच्या आई-वडिलांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात

दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. आर. गोरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे, सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी धरून शिक्षा ठोठावली आहे

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!