Monday, December 6, 2021

नगर जिल्ह्यातील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे राहणारा तरुण अक्षय अरविंद फोपसे,वय पंचवीस वर्ष याचा पुण्यातील कोथरूड भागात कर्वे चौकामध्ये

मोटरसायकलवर डिव्हायडरला आदळून मृत्यू झाला आहे.अधिक माहिती अशी की,अक्षय हा एका आयटी कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होता.गेल्याच आठवड्यात पुण्याकडे पुन्हा कामावर रुजू झाला होता.

त्याच्या बुलेट मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यावर बारीक खडी असल्यामुळे मोटारसायकल घसरून हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान गोंडेगाव येथे त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीमुळे गोंडेगावकर यांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले होते. गोंडेगावचे प्रगतशील शेतकरी अरविंद फोपसे यांचा तो एकुलता एक मुलगा होता.

ताज्या बातम्या

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...
error: Content is protected !!