Friday, December 3, 2021

दिवसातुन एवढीच अंडी खाणं शरीरासायाठी चांगलं नाही तर…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अंडी हे लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्यापैकी बरेच लोकं हे अंडी खातात. काही लोकं वजन वाढवण्यासाठी तर काही लोकं हेल्थी लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठी अंडी खाता. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का,

की दिवसभरात किती अंडी खाणं तुमच्या शरीसाठी फायदेशीर आहे? अंड खाण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहे. त्यामुळे तुम्ही ते जर जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमच्या शरीरातचे नुकसान होऊ शकते.

जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, कारण अंड्याच्या मध्यभागी भरपूर कोलेस्ट्रॉल असते. एका अंड्यातील पिवळ बलकमध्ये सुमारे 200 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि दररोज 300 मिलीग्रामपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात जाणं चांगलं नाही.

पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, आहारातून खाल्लेले कोलेस्टेरॉल शरीरातील वाईट आणि चांगले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकत नाही, ज्यामुळे चरबीमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल अधिक वाढते.

एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किती अंडी खावीत याबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे उत्तर देणे तसे कठीण आहे, कारण ते प्रत्येक व्यक्तीवर आणि त्याच्या शरीर आणि वजनावरती अवलंबून असते. कारण प्रत्येकाचे आरोग्य वेगळे असते.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, ज्या व्यक्तीचे आरोग्य सरासरी आहे. ती व्यक्ती आठवड्यातून 7 अंडी खाऊ शकते, परंतु जर तुम्हाला कोणताही आजार किंवा इतर कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या नसतील, तर तुम्ही एका दिवसात सुमारे 3 अंडी खाऊ शकता.

अंडी पौष्टिक असतात पण याचा अर्थ असा नाही की, तुमच्या शरीराला हवी तेवढी अंडी खावीत. उन्हाळ्यात जास्त अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे अतिसाराची समस्या देखील होऊ शकते.

विशेषत: लहान मुलांना अंड देताना देखील याचा विचार करावा, म्हणून आपण नियंत्रणासह अंड्याचे सेवन केले पाहिजे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!