Friday, December 3, 2021

चिलेखनवाडी ग्रामपंचायतीकडून वीज उपकेंद्राला कुलूप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील चिलेखनवाडी येथील वीज उपकेंद्राकडे थकीत असलेला कर वसूल न झाल्याने ग्रामपंचायतने उपकेंद्र दुसऱ्यांदा कुलूप लावले आहे.

चिलेखनवाडी ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा 4 लाख 77 हजार रुपये मालमत्ता कर वीज वितरण कंपनीकडे थकीत आहे. याबाबत ग्रामपंचायतने वेळोवेळी मागणी बील व नोटीसीद्वारे वीज वितरण कंपनीकडे मागणी केली. परंतु कर वसूली न झाल्याने अखेर ग्रामपंचायतने 11आक्टोबर रोजी रितसर नोटीस देऊन वीज उपकेंद्रास कुलूप ठोकले होते . त्या वेळ उपकार्यकारी अभियंता नेवासा यांनी 21 दिवसात कर भरण्याचे लेखी आश्वासन दिल्याने त्याच दिवशी सील काढण्यात आले होते .

परंतु मुदतीत कर वसूल न झाल्याने ग्रामपंचायतने नोटीशीद्वारे थकीत कर भरणे बाबत मागणी करून कर न भरल्यास पुन्हा वीज उपकेंद्र सील करण्याचे कळविले. तेव्हा विज कंपनीस जाग आली. ग्रामपंचायतने मागणी केलेली कराची रक्कम वीज वितरण कंपनीने अमान्य करुन ग्रामपंचायतीस 1 लाख 29 हजार 356 रुपयाचा धनादेश दिला. परंतु वीज वितरण कंपनीने केलेली दर आकारणी व मोजमापे ग्रामपंचायतीने अमान्य करत उर्वरित रक्कम भरणेबाबत मागणी करून उपकेंद्राला कुलुप लावले आहे.

यामुळे परिसरातील सुकळी, कुकाणा, पाथरवाला, तेलकुडगाव, देवसडे, तरवडी व चिलेखनवाडी येथील लोचनाबाई ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु सांयकाळपर्यंत तोडगा निघू शकलेला नाही.

यावेळ शरद आरगडे, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत, उपसरपंच नाथा गुंजाळ, उद्योजक बी.डी. पुरी, उपकार्यकारी अभियंता शरद चेचर, पोलिस उपनिरीक्षक एन.एन. पाटील, ग्रामसेविका कविता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुहास गायकवाड, सचिन वाघमोडे, मधुकर काटे, छबूराव कांबळे, संजय सावंत, पांडुरंग मुरकुटे, सोपान चोपडे, अर्जुन गाडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी संजय इंगळे, नितीन कांबळे, कैलास गायकवाड, रमेश वाघमोडे, राजू वाघमोडे, व ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!