Friday, December 3, 2021

सोनई महाविद्यालयात संविधान दिन साजरा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राज्यशास्र विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत हक्क,व कर्तव्य, तसेच संविधानाचे महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. आजच्या युवकांनी संविधानाचे वाचन करून त्याचा उपयोग एक उज्ज्वल भारत देश घडविण्यासाठी केला पाहिजे. भारताचे संविधान एक लोकतंत्र राज्य चालवण्यासाठी कश्याप्रकारे उपयुक्त आहे या विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाचे

प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी संविधानाचे महत्व पटवून देत असताना संविधानाविषयी समाजामध्ये जनजागृती करून व त्याचा योग्य उपयोग कशाप्रकारे करता येईल या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला सामाजिक ,आर्थिक व राजनैतिक स्वातंत्र तसेच शिक्षण,आरोग्य,व इतर मुलभूत हक्क आणि विचारमांडण्याचा अधिकार मिळाला, संविधानची प्रचिती व्हावी म्हणून संविधान दिवस महाविद्यालयात साजरा केला जातो असे मत प्राचार्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. योगेश साळवे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन राज्यशास्र विभागप्रमुख डॉ. अविनाश साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.महेश जंगले यांनी केले.
डॉ. शरद दरंदले, डॉ. मच्छिंद्र वर्पे, डॉ. निवृत्ती मिसाळ, डॉ. रवींद्र खंदारे , डॉ. राजेश वाघ, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. सुरेश जाधव, प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. बाळासाहेब खेडकर , प्रा. शरद औटी, डॉ. श्वेता चौधारे व इतर प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!