Saturday, January 22, 2022

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५ पेक्षा जास्त पानांचा अहवाल असून घटनेच्या

विविध पैलूंचा अभ्यास करत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल सोमवारी (ता.२९) राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे सादर होईल, अशी माहिती सूत्रांकडून समजली.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयातील आगीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय

आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. घटनेसंदर्भात समितीच्या सहा वेळा बैठका झाल्या. त्याचबरोबर २५ ते ३० जणांचे जबाब या समितीने नोंदविले आहे. समितीच्या घटनेच्या अनुषंगाने काल शेवटची बैठक नाशिक येथे झाली.

या संदर्भात रात्री उशिरापर्यंत मॅरेथान बैठका झाल्या. समितीने केलेल्या चौकशीत घटनेशी निगडीत असलेल्या प्रत्येक पैलूंचा अभ्यास केला आहे. विद्युत पुरवठा, रुग्णालयाच्या वार्डमध्ये असलेली बेडची संख्या, घटनेच्या वेळी उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी,

रुग्णांचे नातेवाईक, आग विझवण्यासाठी पोहोचलेले अग्निशमन दल, आग पसरण्यासाठी ठरलेली कारणे, अडचणी, घटनेच्या वेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा आदी मुद्द्यानुसार चौकशी समितीने अभ्यास केला.

याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान निधीतून मिळालेल्या व्हेंटीलेटर मध्ये स्पार्क होऊन ही आग लागली असा आरोप केला होता. त्या संदर्भात देखील समितीमध्ये चर्चा झाली. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील एक्सप्रेस फिडर मधून खासगी रुग्णालयाला दिलेल्या विद्युत कनेक्शनची देखील चौकशी समितीने या अहवालात दखल घेतली आहे.

समितीने तयार केलेला हा अहवाल सोमवारी राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे सादर होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यावर काय निर्णय घेतात ? याकडे लक्ष लागले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीत १७ पैकी १४ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

त्यातील एक रुग्ण अजूनही उपचार घेत आहे. दोघांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!