Saturday, January 22, 2022

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच केला आहे. मात्र, तरीही

नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे कारण कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्युदर मात्र चिंताजनक आहे.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र ही लाट अत्यंत सौम्य प्रमाणात

असेल असा दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे कोरोनाचा रुग्णांमध्ये घट होताना रुग्णांच्या मृत्यु दरात झालेली वाढ मात्र काहीशी चिंताजनक आहे. यासंदर्भात राज्याची आजची नेमकी स्थिती काय आहे हे जाणून घेऊया.राज्यात गुरुवारी ८४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

तर ९७४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.नव्या बाधित होणाऱ्या रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, हे दिलासादायक चित्र आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९१८७ इतकी आहे. मात्र गुरुवारी

राज्यभरात ५० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून हा आकडा मात्र चिंताजनक आहे.गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या घटताना दिसते आहे. गुरुवारी ८४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असताना ९७४ कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत

 तर राज्यात नऊ हजार ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६४ लाख ७९ हजार ३९६ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे

प्रमाण आता ९७.६८ टक्के इतकं झाले आहे. आज पर्यंत सहा कोटी ५० लाख ४७ हजार ४९१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६६ लाख ३३ हजार १०५ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण १०.२ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ९० हजार ५३८ जण होम

क्वारंटाईन आहेत तर १०६५ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ८५७ इतकी झाली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!