Saturday, January 22, 2022

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ अपलोड करुन महिला कर्मचाऱ्याची बदनामी केल्याची

खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस विभागात मात्री एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक सामान्य नागरिक विशेषत: महिला अशा प्रकाराला बळी पडल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र, आता थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या

बाबतीच असा प्रकार घडत असल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.दरम्यान, आता याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याची बदनामी करणाऱ्या आरोपी विरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या क्राईम निरीक्षक

अनिता हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याराने याप्रकरणी तक्रार नोंदवली आह. तक्रारीनुसार तक्रारदार महिलेच्या नावाने दोन बनावट अकाउंट सोशल मीडियावर तयार करण्यात आले होते.

याच सोशल मीडिया अकाउंटमध्ये असं म्हटलं होतं की, ‘पोलीस मी माझ्या नवर्‍याला सोडून दिले आहे’. अटीट्यूड गर्ल, माय लाईफ, माय चॉईस, माय मिस्टेक, बिलिव्ह इन माय सेल्फ’ असे लिहून फिर्यादी महिला कर्मचाऱ्याच्या अकाउंटवर मजकूर पोस्ट करण्यात आला.

तसेच तो मजकूर देखील व्हायरल करण्यात आला. याशिवाय त्यावर अश्लील व्हीडिओ देखील पोस्ट करण्यात आला होता.दरम्यान, ही घटना समोर येताच फिर्यादी महिला पोलीस कर्मचार्‍यांनी तक्रार देताच याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!