Sunday, June 4, 2023

ATM मधून पैसे काढल्यानंतर कॅन्सल बटण दाबणं गरजेचं? जाणून घ्या उत्तर

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:एटीएममधून पैसे काढल्यानंतर अनेकदा लोक कॅन्सल बटण दाबतात. तुमच्या आणि माझ्यासह जवळपास प्रत्येकजण पैसे काढल्यानंतर कॅन्सल बटनवर क्लिक करता.

ही आपली सामान्य सवय झाली आहे. असं केलं नाही तर मग आपले पैसे सुरक्षित नाही किंवा ट्रांझेक्शन अपूर्ण असल्याचं आपल्याला वाटतं. महत्त्वाचं म्हणजे आपण कॅन्सलवर क्लिक केल्यानंतर आपण सुरक्षितरित्या पैसे काढले आहेत अशी भावना

आपल्या मनात येते. म्हणजेच यानंतर कोणीही पासवर्ड टाकल्याशिवाय पैसे काढू शकत नाही असा विचार आपण करत असतो.दोन वर्षांपूर्वी कॅन्सल बटणाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. यामध्ये

कॅन्सल बटन हे नंतर नाही तर आधी दाबण्याचा सल्ला दिला होता. त्यामध्ये लिहिले होते की, जर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलात तर कार्ड टाकण्यापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबा. यामध्ये असंही लिहिलं होतं की, पासवर्ड चोरण्यासाठी कोणी सेटअप

लावला असेल तर तो रद्द होईल. ही पोस्ट आरबीआयची सूचना म्हणून व्हायरल झाली होती.ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली होती. यानंतर सरकारला यावर स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं. पीआयबीने या पोस्टचे फॅक्ट तपासले आणि ती पोस्ट

बनावट असल्याचं म्हटलं. पीआयबीने ट्विटरवर लिहिले, ‘आरबीआयच्या नावाने चालवल्या जाणार्‍या बनावट पोस्टचा दावा आहे की एटीएममध्ये व्यवहार करण्यापूर्वी दोनदा कॅन्स बटण दाबल्याने पासवर्ड चोरी टाळली जाते. मात्र हे खोटं विधान

आहे आणि ते आरबीआयने जारी केलेले नाही.’ RBI ने पुढे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी 2 मार्गांचा उल्लेख केला आहे. पहिला- तुमचा व्यवहार पूर्ण प्रायव्हरसीने करा आणि दुसरे- कार्डवर पिन कोड लिहू नका.

ट्रांझेक्शन पूर्ण झाल्यानंतर कोणतेही एटीएम कार्डविषयीची सर्व माहिती डिलीट करते. याचा अर्थ तुम्ही कॅन्सल बटणवर क्लिक केलं नाही तरीही माहिती तिथे सेव्ह होणार नाही. मात्र, काही एटीएममध्ये तुम्हाला ट्रांझेक्शन सुरू ठेवण्यास सांगितले जाते.

ते नक्कीच कॅन्सल करा. यासोबतच, व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आणि मशीनवर होम स्क्रीन पुन्हा दिसू लागल्यावर तुम्हाला कॅन्सल बटण दाबण्याची गरज नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!