Saturday, January 22, 2022

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला.

शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.अमोल मोहनराज वामन (वय 36 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. वडगावपान शिवारात तळेगाव दिघे प्रादेशिक पाणी योजनेचा साठवण तलाव असून

नजीक रस्त्याच्याकडेला प्रचंड काटवन आहे. रस्त्याच्याकडेच्या काटवनात अमोल मोहनराज वामन या तरुणाचा मृतदेह आढळून आला.याबाबत माहिती मिळताच वडगावपान युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात, पोलिस पाटील सुभाष थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली. पो. हे. कॉ. विष्णू आहेर, पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांनी घटनास्थळी येथून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविला. निलेश थोरात, उपसरपंच सोमनाथ गायकवाड,

सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, सचिन रणधीर, नितीन गायकवाड, सलमान शेख, वसिम पठाण, आदिनाथ गायकवाड यांनी यावेळी पोलिसांना मदतकार्य केले.अमोल मोहनराज वामन याच्या अंगात शर्ट नव्हता, त्याचा शर्ट नजीकच्या झाडाला लटकलेला होता.

त्याची दुचाकीही नजीकच उभी होती. नजीक विषारी औषधाची बाटली व अन्य वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार आत्महत्या की घातपात याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!