Wednesday, December 8, 2021

काँग्रेसचं नवं युट्यूब चॅनेल सुरू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:काँग्रेसने आयएनसी टीव्ही हे नवं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून हे चॅनेल सुरू करण्यात आलं असून चॅनेलद्वारे सत्य सांगण्यात येणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत हे चॅनल सुरू करण्यात आलं आहे. या चॅनेलद्वारे लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवली जाणार आहे. तसेच

देशातील विविध समस्यांवर या चॅनेलद्वारे फोकस देण्यात येणार आहे, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. हे चॅनेल युट्यूब, फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडियावर उपलब्ध राहणार आहे. या चॅनेलद्वारे काँग्रेसची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारची पोलखोल करण्यात येणार असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

चॅनेल लॉन्च केल्यानंतर या चॅनेलवरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. ही डॉक्युमेंट्री काँग्रेसच्या सर्व राज्यातील ट्विटर हँडलवरून रिट्विट करण्यात आली आहे.

आयएनसी टीव्हीद्वारे देशातल्या जनतेला सत्य समजून घ्यायला नक्की मदत होईल याची खात्री आहे. हे चॅनेल “लोकांचा आवाज” म्हणून ओळखले जाईल असा विश्वास वाटतो, असं ट्विट सतेज पाटील यांनी केलं आहे

 

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!