Saturday, November 27, 2021

आमदार रोहित पवारांची फेसबुक पोस्ट ही लढाई संपूर्ण मानवतेची..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय.रोहित पवारांनी एक फेसबुक पोस्ट लिहूनही लढाई संपूर्ण मानवतेची’ आहे असे सांगितले.

मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाहीय किंवा या मुद्याचं राजकारणही करायचं नाहीय. मला विरोधकांनाही हेच सांगायचंय की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. हे संकट वेगळं आहे.

ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. आमच्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतोय. आज या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतोय.

आज ही स्थिती हाताळणारी प्रत्येक सरकारी यंत्रणा मग ते पोलीस असोत की आरोग्य कर्मचारी असोत की अत्यावश्यक सेवा पुरवणारी यंत्रणा असो ही प्रत्येक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येक माणूस पूर्ण क्षमतेने या परिस्थितीला सामोरा जात आहे. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे.

आज राज्य, विभाग, प्रदेश सोडून एक देश म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल आणि या संकटावर मात करावी लागेल. मानवतेच्या मुळावर उठलेल्या या संकटाचा सर्वांनी एकत्रितपणे मुकाबला करून संपूर्ण जगाला एक वेगळा संदेश आपल्याला देता येईल.

त्याची हीच वेळ आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करुयात आणि कोरोनाच्या संकटाला थोपवूयात!

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!