माय महाराष्ट्र न्यूज:ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेवून शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.
राज्याच अवकाळी पावसाने थैमान घातलं असून शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलं आहे असं
म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. दरम्यान राऊतांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणले, “बेईमानी आणि गद्दारीची बिजे गेल्या साडेतीन वर्षापासून रूजवली जात होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही
बंडाचे प्रयत्न सुरू होते. तेव्हा हे सगळे लोक अहमद पटेल यांना भेटून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. अहमद पटेल यांच्याशी बैठकाही झाल्या होत्या. शरद पवार यांच्या आत्मचरित्रात अदानी आणि अनेक उद्योगपती यांच्या बद्दल लिहिलं आहे,
त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, पवारांनी लिहिलं त्यात चुकीचं काय आहे. त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या असतील, त्यांच्या आयुष्यातील आलेल्या प्रमुख व्यक्तींविषयी त्यांनी भूमिका मांडल्या असतील त्याच्यावर आता चर्चा करण्याचं कारण काय. गौतम आदानी
यांच्या विरोधात या देशात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आगोदर असे प्रश्न टाटा आणि बिर्ला यांच्या संदर्भात देखील उपस्थित करण्यात आले होते