Saturday, June 10, 2023

नगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना: याठिकाणी आढळला महिलेचा मृतदेह

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:मुळा धरणात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच तांदुळवाडी (ता. राहुरी) येथील मुळा पात्रात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने

खळबळ उडाली आहे. तांदुळवाडी शिवारात मुळानदी पात्रात अंदाजे 55 ते 60 वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास मुळानदी पात्रात काही आदिवासी

बांधव मासेमारी करण्यासाठी गेले असता त्यांना एका अनोळखी महिलेचा मृतदेह नदीपात्रात पाण्यात तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ ही माहिती राहुरी पोलिसांना कळवली.राहुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी येऊन महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

मृतदेह जास्त दिवस पाण्यात राहिल्याने कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत महिलेची ओळख पटविण्यात अडसर निर्माण झाला. याकामी राहुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी नदिम शेख, शिवाजी खरात यांना तांदुळवाडीचे अमोल पेरणे, अविनाश पेरणे, बाळासाहेब कांबळे,

नवनाथ खाटेकर, महेश मोरे, रुग्णवाहिका चालक सचीन धसाळ व कोंढवड ग्रामपंचायतचे कर्मचारी सुभाष बर्डे यांनी भर पावसात मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली. मृतदेह उत्तर तपासणी साठी राहुरी येथे नेण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!