Saturday, January 22, 2022

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर परिसरात शोककाळा पसरली आहे.

राजूर येथील समीर शांताराम पवार (वय १४), सोहम शांताराम पवार (वय ११) हे मयतांचे नाव आहे.मुंबई येथे राहणारे आकाश रमेश जाधव, अर्जुन विनोद गायकवाड हे दोघे राजूर येथे फिरण्यासाठी मुंबई येथून आले होते. या दोघांना समीर पवार व सोहम

पवार हे दोघे रविवारी सायंकाळी चार वाजता निळवंडे जलाशयावर घेऊन गेले होते. तेथील पाणी पाहून ते आनंदीत झाले. समीर व सोहम हे कपडे काढून जलाशयाच्या पुलाच्या खाली जाऊन

आंघोळीसाठी पात्रात उतरले, आणि त्याचवेळी प्रवाह वाढल्याने तेथे भोवरा तयार झाला, व दोघे पाण्यात बुडाले.त्यावेळी आकाश जाधव व अर्जुन गायकवाड पुलावर उभे राहून जलाशयात पडणारे पाणी पाहत होते. त्यांनी पुन्हा समीर व सोहम यांना

शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते दोघे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली असता त्यांना मुलांचे कपडे व चपला दिसल्या. या घटनेची माहिती आकाशने मुलांच्या वडिलांना कळवली. नातेवाईक मोठ्या संख्येने जलाशयवर जमा झाले.

मुले पाण्यात वाहून गेल्याचा संशय आल्याने स्थानिक आदिवासी ठाकर समाजाचे मच्छीमार सोमनाथ मेंगाळ यांनी सायंकाळी नदीपात्रात टायर घेऊन शोधाशोध केली असता त्यांच्या हाती रात्री उशिरा समीरचा मृतदेह सापडला. तर सोमवारी सकाळी

सोहमचा सापडला. अकोले पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!