माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रातील मागील काही दिवसांपासून मोठ मोठ्या घडामोडी घडत आहेत. कोर्टाने आदेश दिल्यानंतर राज्यात बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आहेत, त्यामुळे
प्रचारात अनेक नेते उतरले आहेत. अशातच धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रचारात आले होते.यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.तर ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 38 जागा आणि विधानसभेच्या
निवडणुकीत 180 जागा मिळतील, असं म्हणाले. राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी अनेक ठिकाणी गारपीट आणि अतिमुसळधार पाऊस पाडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
अशा परस्थितीत राज्याचे प्रमुख राज्यातून परराज्यात म्हणजेच अयोध्यात गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी राज्यकर्ते नाहीत.ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं.
अजित पवारांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली होती. याबाबतही बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आलं, त्यावेळी थोरात म्हणाले की, जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो. कुणी
काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष केले.