Sunday, June 4, 2023

तरुणीनं रोहित पवारांकडे मागितला हा सल्ला…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावरून संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या राजकारणापासून ते इतर

सर्व विषयांवरील प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. याचदरम्यान, एका तरुणीने रोहित पवार यांना विचारलेल्या एका प्रश्नाची सध्या चर्चा होत आहे.या तरुणीने रोहित पवार यांना विचारलं की, दादा माझं एका मुलावर खूप प्रेम आहे आम्ही

दोघे लग्न पण करणार आहोत. पण मुलाच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होत नाही आहेत. म्हणून आम्ही दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मते मी काय करू..? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवान म्हणाले की, पळून जाण्यासाठी

आई-वडीलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा!यावेळी रोहित पवार यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्याकडून कामाची प्रेरणा मिळते असे आपण सांगता. मात्र, कुटुंबातीलच अशा नेत्यांसोबत काम करताना कधी

मनावर दडपण येते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले की, सामान्य लोक साहेबांच्या धोरणांबाबत अंदाज बांधू शकतात. मात्र राजकीय लोकांनी साहेबांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नये.

दडपण येतं! साहेबांसारखी legacy असेल तर नक्कीच येतं, असे त्यांनी सांगितले.तर तुमचा बायोपिक करायचा झाला तर तुमच्या रोल बद्दल तुमची निवड कोण असेल. वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? असा प्रश्नही रोहित पवारांच्या एका चाहत्याने विचारला.

त्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले की, माझा रोल मलाच करायला आवडेल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!