Wednesday, December 8, 2021

जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे कडाडल्या म्हणाल्या..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :कुकडीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून तालुक्यातील नेत्यांनी नागरीकांची दिशाभूल न करता पाणीप्रश्न सोडविण्याकरिता एकत्र येवून लढा उभारला पाहिजे. तसेच नागवडे कुटुंबीयांनी आजवर तालुक्यातील महत्वाच्या प्रश्नांसाठी कधीही राजकारण केले नाही.

मात्र तालुक्यातील नेतेमंडळी कुकडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याऐवजी फक्त वेळकाढूपणा करीत कोणतेही ठोस पावले उचलीत नसल्याने चालू महिन्यात कुकडीचे आवर्तन मिळविण्यासाठी मोठा लढा उभारावा लागणार असून याबाबत आपण तालुक्यातील महिलांना, तरुणांना सोबत

घेऊन आता मंत्रालय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सहकारमहर्षी नागवडे कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांनी सांगितले.नागवडे म्हणाल्या की, तालुक्यातील नेत्यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. पक्षभेद, राजकारण बाजूला

ठेवून पाणीप्रश्नावर एकत्र यावे. नागवडेंकडे यायला काहींना अडचण असेल तर तुम्ही सांगा आम्ही तिथं येऊ पण कुकडी पाणीप्रश्न सोडवावा लागेल. या प्रश्नी जनतेच्या भावनांशी खेळू नका असे सांगत पाणीप्रश्नी राजकारण करणार्‍यांचा नागावडे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला.

तसेच पाणीप्रश्नी आपल्यासोबत तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र यावे अशी माझी अपेक्षा आहे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आपण आता या प्रश्नासाठी लढा देणार असल्याचे नागवडेंनी सांगितले. तसेच बाकीच्या तालुक्यांमध्ये मोठे कोव्हिड सेंटर उभे राहत असतानाच श्रीगोंद्यात कोविड

सेंटर उभारण्याबाबत राजकीय नेते मात्र उदासीन दिसत आहेत. शासकीय कोविड सेंटरसाठी छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जागा उपलब्ध करून देणार असून काही दिवसातच याठिकाणी 250 बेडचे सेंटर सुरू होईल असेही नागवडे यांनी सांगितले तसेच

कोरोनामुळे श्रीगोंदा तालुक्याची अर्थव्यवस्था ठप्प होऊ नये यासाठी सर्वांच्या सूचना विचारात घेऊन उपाययोजना करणार असल्याचे देखील अनुराधा नागवडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!