Saturday, January 22, 2022

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान प्रवाशांनी दोन्ही डोस घेतलेले आवश्यक

अन्यथा ४८ तासांपूर्वी RT-PCR बंधनकारक करण्यात आली होती. पण आता राज्य शासनानं पुन्हा या नियमावली बदल केला आहे. नव्या नियमावलीनुसार, ४८ तासांऐवजी ७२ तासांपूर्वीची RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

हाय रिस्क देशांमध्ये तीन देशांचा समावेशराज्यानं काढलेल्या नव्या नियमावलीनुसार, हाय रिस्क देशांच्या यादीत तीन देशांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी यामध्ये सहा देशांचा समावेश होता. नव्या नियमावलीनुसार, तीन देशांमध्ये दक्षिण अफ्रिका, बोटस्वाना आणि झिम्बाब्वे

या देशांचा समावेश आहे. ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटच्या उद्रेकाची स्थिती आहे, अशा देशांचा समावेश हाय रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. या निकषांनुसार तो राज्य सरकारकडून यापुढेही अपडेट केला जाईल, असंही या नव्या नियमावलीत म्हटलं आहे.’

हे’ प्रवासी असतील हाय रिस्क एअर पॅसेंजर१) जे विमान प्रवाशी हाय रिस्क देशांमधून महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. २) महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी गेल्या १५ दिवसांत ज्या व्यक्तींनी हाय रिस्क देशांना भेटी दिल्या आहेत.
हाय रिस्क देशांमधून आलेल्यांसाठी ‘हे’ नियम बंधनकारक हाय

 रिस्क देशांमधून महाराष्ट्रातील विमानतळांवर आलेल्या सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग आणि व्हिरिफिकेशन करण्यात येईल. तसेच त्यांची संबंधित विमानतळांवर तातडीनं RT-PCR चाचणी करण्यात येईल. तसेच त्यांना सात दिवस संस्थात्मक क्वारंटाइन राहणं बंधनकारक असेल.

यानंतर सातव्या दिवशी त्यांची दुसरी RT-PCR चाचणी करण्यात येईल. या चाचणीमध्ये जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर अशा हाय रिस्क पॅसेंजरला उपचारांसाठी कोविड केअर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल. तसेच सात दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाइननंतर

जर प्रवाशाचा रिपोर्ट निगेट्वि आला तर त्या व्यक्तीला पुढील सात दिवस होम क्वारंटाईन रहावं लागेल.चुकीची माहिती दिल्यास कारवाई होणारDCP इमिग्रेशन आणि FRRO हे घोषणापत्राचा मसुदा तयार करतील. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्रवास केलेल्या प्रवाशांनी

गेल्या १५ दिवसांत भेट दिलेल्या देशांचा तपशील जाहीर करावा लागेल. तसेच त्यांचा हा रिपोर्ट मुंबई इंटरनॅशन एअरपोर्ट (MIAL) सर्व एअरलाईन्ससह शेअर करेल. तसेच प्रवासासंबंधीची माहिती शेवटच्या 15 दिवसात आगमन झाल्यानंतर इमिग्रेशनद्वारे क्रॉस चेक केली जाईल. यामध्ये जर एखाद्या प्रवाशानं

चुकीची माहिती दिल्याचं आढळून आलं तर त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अतंर्गत संबंधित कलमांखाली कारवाई केली जाईल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!