Saturday, January 22, 2022

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं उघड झालं आहे. खासदारकीला भाजपाने माणूस

उभा केला त्याने नंतर माघार घेतली. प्रज्ञा सातव यांच्या निवडणूकित भाजपने माणूस उभा केला त्याने माघार घेतली. हे एक घोतक आहे की यांचं आतून काही तरी जमलेलं आहे. म्हणून या पद्धतीने सर्व चाललेलं आहे असे मत वंचित बहूजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

मी असं मानतो, की एक नवीन आघाडी उभी राहू पाहतेय म्हणून मी अस सांगतो की पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अजित पवार यांनी पक्ष सोडून बीजेपी बरोबर जाऊन बसले होते.

नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यांच्या विरोधात ज्या काही चौकशा होत्या त्याच काय झालं हे स्पष्टचं आहे, आणि ते पुन्हा बॅक टू पव्हॅलीयन आले. एनसीबी मध्ये अनेक मंत्र्यांच्या विरोधात चौकशा सुरू आहेत. एक स्पष्ट आहे की जे छुपं होत ते आता उघडं

पडलं आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. एक सरळ दिसतंय की NCP ने ममता बॅनर्जी यांच्या माध्यमातून काँग्रेस वाल्यानं उघड पाडलं आहे. काँग्रेस वाल्यांला थोडीशी लाज शिल्लक असेल तर ते या सरकार मधून बाहेर पडतील. आणि स्वतःची गेलेली अब्रू वाचवतील.

माझं कोर्टाकडे एकच मागणं राहणार आहे की आता पर्यंत जो काही तपास झाला आहे, त्या तपास अधिकाऱ्याने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर हायकोर्ट विश्वास ठेवत होत. आता मी कोर्टात एवढीच विनंती करेन की जो कोणी तपास अधिकारी आहे .

त्याला कोर्टाच्या अधिपत्या खाली घ्या आणि त्याला सांगा की जेवढी कागदपत्रे कोर्टाने नाव नंबर सह ताब्यात घेऊन रजिस्टर कडे द्यावीत, आणि विरोधी पक्षाच्या लोकांना इंस्पेक्षण करायला द्यावीत. जेणे करून खरं काय ते बाहेर येईल असे मत प्रकाश आंबेडकर यांनी परमबीर सिंग प्रकरणावर व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!