Saturday, January 22, 2022

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आली आहे. दोन पोलिसांकडून एका महिलेसोबत

जबरदस्तीने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन दोघा पोलिसांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी फरार झाले आहेत.बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिस स्टेशन अंतर्गत

येणाऱ्या जामोद गावात पीडित महिला आपल्या पती आणि मुलीसह राहते. महिलेचा पती 25 नोव्हेंबर रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. महिलेचा पती घरी नसल्याची संधी साधत हे दोन्ही पोलीस रात्रीच्या सुमारास महिलेच्या घराचे बंद तोडून घरात घुसले.

त्यांनी महिलेशी अश्लील संभाषण करुन शरीर सुखाची मागणी केली. यावेळी महिला आणि पोलिसात सुरु असलेले संभाषण ऐकून शेजारच्या खोलीत झोपलेली महिलेची मुलगी जागी झाली. मुलीने मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा सुरु केला. मुलीचा आरडाओरडा पाहून या पोलिसांनी तिथून पळ काढला.

श्रीकृष्ण संदुके आणि दाते मेजर अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून ते जामोद पोलीस चौकीत पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत. महिलेच्या मुलीने आरडाओरडा केल्याने पोलिसांनी घरातून पळ काढला. मात्र त्यानंतर महिलेच्या मोबाईलवर

अनेक वेळा फोन करुन पुन्हा शारीरिक सुखाची मागणी करीत होते. अखेर महिलेने या सर्वाला कंटाळून पोलीस स्टेशन गाठले आणि या नराधमांविरुद्ध तक्रार नोंदवली. तक्रारीच्या पडताळणीनंतर या दोघांविरुद्ध कलम 354, 354 अ, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!