Saturday, January 22, 2022

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीमुळे काहीशी चिंता वाढली आहे.

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉन विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले आहेत.आरोग्य मंत्रालयाने या संबंधीत माहिती देताना सांगितले की, Omicronशी संबंधित दोन्ही रुग्णांमध्ये

आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ओमिक्रॉनने बाधित झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची ओळख पटली असून त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरां लक्ष असणार आहे. तसेच सर्व बाबींमध्ये प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.

देशातील आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. WHO ने म्हटलं आहे की, या रुग्णांच्या लक्षणांवर अभ्यास केला जातोय.कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भारताला मोठं

नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमिवर सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मुद्दाची दखल घेतली असून, आज संसदेत यावर चर्चा झाली आहे. त्यातच आज हे दोन रुग्ण आढळल्याने आता चिंता वाढली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!