Sunday, June 4, 2023

नेवासा तालुका खरेदी  विक्री  संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर कोलते यांची बिनविरोध निवड

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा

माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या अधिपत्या खालील नेवासा तालुका सहकारी खरेदी विक्री
संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर राजधर कोलते तर उपाध्यक्षपदी संतोष मूलचंद फिरोदिया यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नेवासा तालुका  खरेदी विक्री  संघाच्या संचालक मंडळाची निवडणुक दि.९ मार्च रोजी बिनविरोध झाली होती. आहे.१९७७ पासून संघची बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे.दि.१० एप्रिल रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी करिता नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा झाली,त्यात अध्यक्षपदी प्रभाकर राजधर कोलते तर उपाध्यक्षपदी संतोष मूलचंद फिरोदिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक सुभाष शंकर चव्हाण, रवींद्र शरद मारकळी, कैलास बाळकृष्ण काळे, विजूचंद देवीचंद चरवंडे, सोपान जनार्दन चौधरी, मच्छिंद्र शंकर कडू, युवराज माणिकराव तनपुरे, निवृत्ती भानुदास थोपटे, बादशाह बुरहाणभाई इनामदार, राजेंद्र रामकृष्ण पोतदार, रमेश विश्वनाथ गोर्डे, डॉ.शुभांगी महेशराजे देशमुख,सुशीलाबाई दत्तात्रय शेटे,दीपक साहेबराव चौधरी,जनार्धन पिराजी पिटेकर हे उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांनी काम पाहिले.संघाचे व्यवस्थापक अशोक पटारे यांनी त्यांना सहाय्य केले.ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले, आमदार शंकरराव गडाख,माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!