माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी होणार आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. कारण महाराष्ट्राचे
राज्यपाल रमेश बैस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. राज्यपालांच्या ट्विटर अकाऊंटवरून या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. राज्यपालांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं असलं, तरीही
या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यपाल झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण झाली आहे, याचा
निकाल आता कधीही लागू शकतो. त्यातच विरोधकांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असा अंदाज वर्तवला आहे.एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल अपेक्षित असतानाच महाविकासआघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून
मतभेद दिसत आहेत. अडानी प्रकरण, सावरकर वाद, पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि ईव्हीएम मशीन यावरून राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली. एवढच नाही तर अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही केलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या या घडामोडी आणि राज्यपालांनी घेतलेली पंतप्रधानांची भेट, यावरून लवकरच मोठ्या घडामोडी घडणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.