Saturday, June 10, 2023

यंदा पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता ?स्कायमेटच्या अंदाजाने शेतकऱ्यांची वाढवली चिंता

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आला आहे. हातात आलेले पीक अवकाळी पावसामुळे गेले आहे. शेतकरी आता

राज्य सरकारकडून मदतीची प्रतिक्षा करत आहे. परंतु आता स्कायमेट या संस्थेने केलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा देशात मान्सून कसा असणार आहे? मान्सूनबाबतचा पहिला अंदाज स्कायमेटकडून

आला आहे. स्कायमेट ही खाजगी हवामान अहवाल देणार्‍या संस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्कायमेटकडूनही हवामानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.स्कायमेटने आता 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते,

यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पहिल्या अंदाजात पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो. सामान्य पावसाची केवळ 25 टक्के शक्यता आहे. यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दीर्घ

कालावधीनंतर सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागरातचा पृष्ठभाग जेव्हा गरम होतो, तेव्हा एल निनोचा परिणाम होतो. याचा

परिणाम नैऋत्य मान्सूनवर होतो. अंदाजानुसार, मे-जुलै दरम्यान अल निनोचा प्रभाव परत येऊ शकतो. जून ते सप्टेंबरपर्यंत देशात मान्सूनही पूर्णपणे सक्रिय होतो. स्कायमेटच्या

अंदाजानुसार एल निनोमुळे दुष्काळ पडण्याचीही शक्यता आहे.एल निनोमुळे यंदा मान्सूनवर कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मान्सून कमी असणार आहे.

तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडेल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!