Sunday, June 4, 2023

भेंडा-सलाबतपुर रस्त्याचे कामासाठी महिला सरपंच आक्रमक;रस्तारोकोसह आमरण उपोषणाचा दिला इशारा

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

नेवासा

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या भेंडा गोंडेगाव सलाबतपुर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण व्हावे या मागणीसाठी भेंडा, गोंडेगाव, नजीक चिंचोली, गोंडेगावच्या महिला सरपंच आक्रामक झाल्या असून या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न केल्यास सोमवार दिनांक १७  एप्रिल रोजी भेंडा येथे रस्तारोको आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबद भेंडा बुद्रुकच्या सरपंचप्रा. उषा मिसाळ,भेंडा खुर्द च्या सरपंच वर्षा नवले, नजीक चिंचोलीच्या सरपंच वनमाला चावरे, सौंदाळाच्या सरपंच प्रियंका आरगडे,गोंडेगाव-पिचडगावच्या सरपंच कविता शिरसाठ यांनी नेवासाचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे
अधिक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,
नेवासा तालुक्यातील भेंडा-गोंडेगांव- सलाबतपुर रस्त्याला मंजूरी मिळून ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्कऑर्डरही मिळालेली आहे. फक्त कॉन्ट्रॅक्टरची दिरंगाई व बेजबाबदारपणामुळे आजपर्यंत हे काम पूर्ण झालेले नाही. जो रस्ता झाला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. या कामासाठी अनेक वेळा उपोषण, मोर्चे व आंदोलने झालेली आहेत. तरी देखील हे काम अपूर्णच आहे. त्यामुळे जनते मध्ये तीव्र नाराजी व रोष निर्माण झालेला आहे. या रस्त्यावर अनेकवेळा छोटे मोठे अपघात ही झालेले आहेत. या रस्त्याचे खडीकरण झाले, मात्र डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे जनतेची अतिशय गैरसोय होत आहे. त्यामुळे भेंडे-गोंडेगाव- सलाबतपुर या रस्त्याचे काम तीन ते चार दिवसात चालु करावे अन्यथा सोमवार दि.१७ एप्रिल २०२३ रोजी भेंडा बुद्रुक बस स्थानक चौकात भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, गोंडेगांव सौंदाळा, नजिक चिंचोली, सलाबतपुर या पंचक्रोशीतील गावच्या सर्व महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे रस्तारोको आंदोलन व आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!