Saturday, January 22, 2022

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये कर्ज देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे.

त्यामुळे ठेवीदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. संपदा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. महसूल मंत्री यांचा निकटवर्तीयांमुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महसूल विभागाकडून केली जात नाही.

त्यामुळे ठेवीदारांवर मोठा अन्याय होत आहे.ज्ञानदेव वाफरे याला महसूल मंत्री हे पाठिशी घालत आहेत. त्यामुळे मंत्री यांना देखील सहआरोप करा, अशी मागणी संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून केली आहे.

महसूल मंत्री नगर दौऱ्यावर आल्यावर त्यांना बांगड्यांचा आहेर देण्याचा इशारा ठेवीदार महिलांनी दिला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार संपदा पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेचा लवकरात-लवकर लिलाव करून ठेवी व्याजासह परत करा.

या मागणीसाठी संपदा पतसंस्था ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले. यावेळी धर्मनाथ पांडकर, संध्या खुळे, ॲड.अनिता दिघे, संतोष लांडे, चंद्रकांत खुळे, पृथ्वीराज मुनोत, अक्षय गांधी, सुरेखा म्हस्के, सुधीर काळे, दिलीप भट, अर्जुन अष्टेकर,

माणिक कोंडे, रावसाहेब उगळे, शोभा चन्नर, विलास आहेर, जगन्नाथ झेंडे, राजेंद्र गांधी, बेबी म्हस्के, रमेश ससे उपस्थित होते.संपदा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे हा काँग्रेसचा पुढारी असून सध्या ठेवीदारांचे पैसे बुडून वाफारे हा राजरोसपणे

राजकीय पुढाऱ्यांसमवेत फिरत आहे. तसेच कर्जत नगरपालिकेचा पक्ष निरीक्षक म्हणून काम करत आहे. महसूल मंत्री यांचा पाठिंबा वाफारेला आहे. न्यायालयाचे लिलाव प्रक्रियेचे आदेश असतानाही तहसीलदार उमेश पाटील यांनी कुठल्याही प्रकारे लिलाव प्रक्रिया राबवली नाही.

उलट ठेवीदारांनी विचारणा केली असता ते स्पष्टपणे सांगतात की, माझ्यावर राजकीय दबाव आहे. यावरून या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप हाेत असल्याचा आरोप ठेवीदारांनी आंदोलनावेळी केली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!