Friday, December 3, 2021

या तालुक्यात लस संपली ;आतापर्यंत 93 जणांचा कोरोनाने बळी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :राहाता तालुक्यात दिवसभरात 184 रूग्ण पॉझिटिव्ह सापडले असून आतापर्यंत 93 जणांचा कोरोनाने बळी गेला . राहाता ग्रामीण रूग्णालयात दिवसभरात 172 अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यात 45 जण पॉझीटीव्ह निघाले.

राहाता, लोणी करोनाचे रूग्ण अधिक आहेत.सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांकडून ऑक्सीजन बेडची मागणी वाढत असल्याने प्रशासनाकडून धर्मशाळेत सुरू असलेल्या करोना सेंटर ऑक्शीजन बेडची क्षमता संपल्याने तसेच ऑक्सीजनचा

तुटवडा भासत असल्याने शिर्डी संस्थानच्या सुपर स्पेशालीटी रूग्णालयातच करोना सेंटर सुरू करण्यात आले असून सुपर स्पेशालीटी रूग्णालयाचा स्वतःचा ऑक्सीजन प्लँट असल्याने तसेच पाच व्हँटीलेटरही यात उपलब्ध असल्याने यातच

तातडीने 70 ऑक्सीजन बेड सुरू केले. अर्धे हॉस्पीटल त्यासाठी वापरले जाणार आहे. आणखी बेड वाढविण्याचे नियोज नअसल्याचे संबधीत अधिकार्‍यांनी सांगितले.

राहाता ग्रामीण रूग्णालयाला रविवारी अवघे 300 लसीचे डोस मिळाले होते. ते दिड दिवसातच संपल्याने काल दुपारपासून लस घेण्यासाठी आलेले रूग्ण रिकाम्या हाती परत गेले. नगर येथून अद्याप लस उपलब्ध न झाल्याचे उद्याच्या

लसीकरणावरही प्रश्नचिन्ह दिसत आहे. दुसरीकडे राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना रूग्ण वाढत असताना लस मिळत नसल्याने नागरीकांत संताप व्यक्त केला जात आहे. लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी नागरीक करत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!