Saturday, January 22, 2022

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुराद हसनवर महिलांवर अत्याचार करण्याशी संबंधित

दोन आरोप करण्यात आले होते. एका प्रकरणात अभिनेत्री माहिया माहीला फोनवरून बलात्काराची धमकी दिली होती. यानंतर माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नातवाबद्दल अश्लील शेरेबाजी केली होती.

‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान शेख हसीना या मुराद यांच्यावर खूप नाराज होत्या. ते आधीच अनेक प्रकरणांमध्ये वादग्रस्त होते. यामुळेच त्यांनी मुरादला राजीनामा देण्यास सांगितले. मंत्री मुराद हसन यांनी अलीकडेच अभिनेत्री माहिया माही हिच्याशी

फोनवर संवाद साधला होता. यावेळी अभिनेत्रीसोबत अभिनेताही होता. संवाद साधताना मुराद काही मुद्द्यावरून अभिनेत्रीवर चिडला. यानंतर मंत्र्याने बलात्काराची धमकी दिली. त्याचा हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

काही दिवसांपूर्वी मुराद यांनी देशाच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या नातवावर अश्लील आणि अपमानजनक टिप्पणी केली होती. लंडनमध्ये राहणाऱ्या जियाच्या नातवाने मुराद यांच्या याआधीच्या काही वक्तव्यांवरून टीका केली होती.

यामुळे मुरादला राग आला आणि त्याने हे कृत्य केले. खालिदा झिया यांचे जवळपास कुटुंब देशाबाहेर आहे. कारण, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. खालिदा सध्या गंभीर आजारी आहेत. सरकारने त्यांना उपचारासाठी देशाबाहेर जाऊ दिलेले नाही.

मुरादबद्दलच्या अनेक तक्रारी यापूर्वी पंतप्रधान शेख हसीना यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्याच्या गैरव्यवहारावर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मुराद २००८ पासून खासदार आहेत. अनेक वर्षे ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी मुरादने देशातील अनेक सेलिब्रिटींविरोधातही वक्तव्य केले आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!