Sunday, June 4, 2023

सावधान:पुरुषांनो तुम्हीसुद्धा टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाता? सवय आजच बंद करा, अन्यथा…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:इंडियाना युनिव्हर्सिटीच्या हेल्थ डिपार्टमेंटच्या यूरोलॉजिस्ट डॉ. हेलन बर्नी यांनी पुरुषांना इशारा देत म्हटले की, टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरणे हानिकारक

ठरू शकते. कारण बॅक्टोरिया असलेले लघवीचे शिंतोडे अनेक दिवस टॉयलेटच्या फर्शीवर तसेच राहतात. हे लघवीचे थेंब तीन फुटांपर्यंत पोहोचू शकतात,असेही अनेक संशोधनातून समोर आले आहे. फ्लशिंगच्या

वेळी लघवी सहा फुटांपर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत लघवीचे थेंब तुमच्या मोबाईलपर्यंत पोहचण्याचीही शक्यता असते. मल आणि लघवीमध्ये अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात. यामुळे जेव्हा तुम्ही टॉयलेट फ्लश करता तेव्हा बॅक्टोरिया

पसरतात. फिजिक्स ऑफ फ्लुइड्सच्या संशोधनात असे आढळून आले की, लघवी जेव्हा फ्लश करतो तेव्हा ५.५ सेकंदात ५७ टक्के बॅक्टेरियाचे कण दूर पसरतात आणि बरेच दिवस ते तसेच टिकून राहतात, अशावेळी पुरुष लघवी करताना

जेव्हा मोबाईल वापरतात तेव्हा मोबाईलमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस पोहोचण्याची शक्यता जास्त असते,जे नंतर तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि तुम्हाला आजारी पाडतात. एवढेच नाही तर इतर अनेक जीवघेणे आजार यामुळे वाढू शकतात.

सार्वजनिक शौचालये बहुतेक वेळा पूर्णपणे गलिच्छ असतात, जे बॅक्टेरियांचे हॉटस्पॉट असतात. अशा परिस्थितीत तुम्ही शौचालयातील कोणत्याही गोष्टींना स्पर्श करता तेव्हा धोकादायक जंतू आणि बॅक्टेरिया तुमच्या

हातापर्यंत पोहोचतात. यात तुम्ही दाराला स्पर्श केला, बाथरुम फ्लश वापरला, भिंतीला हात लावला तरी तुम्ही अनेक बॅक्टेरियांच्या संपर्कात येता. शौचालय हे ठिकाण ई कोलाई, स्ट्रेप्टोकोकस, हेपेटाइटिस ए आणि ई सारख्या बॅक्टेरियांसाठी योग्य प्रजनन स्थळ आहे.

त्यामुळे अतिसार, ताप, शिगेला असे जीवघेणे आजार होऊ शकतात.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!