माय महाराष्ट्र न्यूज: शेवगाव तालुक्यातील जिनिंगमध्ये जवळपास 150 कोटींची दोन लाख क्विंटल कपासाची खरेदी करण्यात आली असून, थोडा दरवाढ
झाल्याने आता कपसाची आवक वाढली आहे. इतर ठिकाणाहून येणारी आवक पाहता आणखी एक लाख क्विंटल कपसाची आवक होण्याची शक्यता आहे. दरवाढ अभावी शेतकर्यांच्या घरात थप्पीला असलेले
कपसाचे उत्पन्न आता विक्रीला येऊ लागले आहे. दोन-तीन महिने कपसाचे दर घसरले होते.7 हजार 500 ते 7 हजार 700 रुपये क्विंटल, असा कमी अधिक बदलता दर पाहता शेतकर्यांना या भावात उत्पन्नाची
विक्री करणे परवडणारे नसल्याने अनेक शेतकर्यांच्या घरात कपसाचे उत्पन्न पडून होते. काही दिवस 9 हजार रुपये क्विंटल दर मिळाला; परंतु थोड्यात दिवसात तो 8 हजाराच्या खाली घसरला. किमान क्विंटल 10 ते 11 हजार रुपये दर मिळावा,
अशी शेतकर्यांची अपेक्षा होती.दोन-तीन महिने जागतीक बाजारपेठेत मंदी असल्याने कपसाची भाववाढ होऊ शकली नाही असा अंदाज व्यापार्यांनी वर्तवला. शेतकरीही परवडणारा भाव होत नाही, तोपर्यंत कपसाची विक्री करायची नाही, असा चंग त्यांनी केला
मात्र हा चंग फार काळ टिकू शकला नाही. त्यामुळे 8 हजार रुपये भाव होताच शेतकर्यांच्या घरातला कापूस बाजारात येऊ लागला. यापेक्षा परत कमी भाव झाले तर काय, या धास्तीने जिनिंगमध्ये आवक वाढली आहे.
पावसाळा सुरू होण्यास अवघा एकदिड महिना बाकी आहे. मे महिन्याच्या मध्यापासून पावसाळ्याचे वेध सुरू होतात. यात शेतकर्यांची खते, बियाणे, खरेदीची लगबग सुरू होते. यासाठी घरात असलेल्या उत्पनाची विक्री करण्याशिवाय त्यांना
पर्याय नसतो. त्यात यंदा निसर्ग सतत बदलता राहीला आहे. उन्हाळ्यात हिवाळा व पावसाळा असे ऋतु एकत्र झाल्याचा अनुभव आला. परिणामी पावसाळ्यात नेमकी ऋतु कसा राहिल या धास्तीने आगुटीलाच रब्बीची धांदल सुरू होणार असल्याने
नाविलाजास्तव शेतकर्यांनी खर्चासाठी कपसाची विक्री सुरू केली. यामुळे बाजारात आवक वाढली आहे.