नेवासा
थोर क्रांतिकारक, लेखक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, स्त्रीवादी आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांच्या जीवनाच्या तत्त्वज्ञानात शेतकऱ्यांची चिंता, स्त्रियांचे शिक्षण आणि सामाजिक न्याय मिळवण्याची तळमळ होती. स्वातंत्र, समता व बंधुता ही त्रिसुत्री महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली आहे असे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त कुकाणा येथे जाणता राजा ग्रुप व सावता परिषदेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात माजी आमदार पांडुरंग अभंग हे बोलत होते. खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक चौधरी, माजी सरपंच एकनाथ कावरे, सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल जावळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे, न्यायाधीश प्रवीण अभंग, मनसेचे जिल्हा सचिव विलास देशमुख, युवा नेते अमोल अभंग, ऍड. गणेश निकम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौधरी, जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे, माजी उपसरपंच आत्माराम लोंढे, सुनील गोर्डे, सोमनाथ कचरे, बाळासाहेब गर्जे, भगवानराव पाटील, मनोज हुलजुते, समीर पठाण, ऍड. राजेंद्र खराडे, ऍड. सागर गोर्डे, डॉ. गणेश आर्ले, उमाकांत सदावर्ते,प्रा. संतोष सोनवणे,अमर कसबे,
इनुस नालबंद प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी माजी आमदार अभंग व इतर प्रमुख उपस्थितांचे हस्ते महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्री.अभंग म्हणाले, “महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी रचला. महात्मा फुले यांनी तत्कालीन समाजातील कर्मठवाद्यांचा विरोध पत्कारत मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या आणि भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा जोतिबा फुले यांचे हे कार्य क्रांतिकारक ठरलं.
यावेळी सिद्धार्थ कावरे, सुशांत सोनावणे, सागर चिमखडे, आकाश खराडे, विराज देशमुख, जावेद शेख, कुणाल धाडगे, दादा पुंड, संकेत खराडे, अभिषेक निकम, आफताब तांबोळी, प्रफुल्ल जावळे, विशाल देव्हारे, अक्षय कावरे, वैभव खराडे, ऋषी पंडित, आकाश शिंदे, शुभम पवार, मयूर लिंगायत, अजित दरवडे, साहिल शेख, निलेश जाधव, नदीम पठाण, शाहरुख शेख, ऋषिकेश तुपे, पप्पू खराडे, प्रफुल्ल कचरे आदी उपस्थित होते. डॉ. संतोष तागड यांनी सूत्रसंचालन केले.