Saturday, June 10, 2023

किसिंग डिसीज म्हणजे नक्की काय ? फक्त Kiss केल्यामुळे पसरू शकतात का आजार ?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज: किसिंग डिसीज हा आजार संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस (मोनो नावाने ओळखला जातो) नावानेही ओळखला जातो. लाळेद्वारे पसरणारा एपस्टाईन-बॅर विषाणू या

आजारामागचं मुख्य कारण आहे. मुख्यतः चुंबनामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे या आजाराचं नाव किसिंग डिसीज असं ठेवण्यात आलं आहे. मोनो असलेल्या एखाद्या व्यक्तीसह ग्लास किंवा जेवणाची

भांडी शेअर करूनही तुम्हाला विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तथापि, मोनोन्यूक्लिओसिस सामान्य सर्दीसारखा संसर्गजन्य नसल्याचं सांगितलं जातं.डॉक्टरांच्या मते किसिंग डिसीज हा काही गंभीर आजार नाही.

पण काही वेळा याची लक्षणं खूप गंभीर असतात. तसंच या संक्रमणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर योग्य वेळी उपचार केले नाही तर संक्रमित व्यक्ती अनेक आठवडे रोजची कामंदेखील करू शकत नाही.

संसर्गाची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात.सुरुवातीच्या दिवसांमध्ये गळ्याला प्रचंड सूज येऊन वेदना होऊ शकतात. यासह मोनोची म्हणजेच किसिंग डिसीजची इतर काय लक्षणे आहेत ते आपण जाणून घेऊयात.

मोनोन्यूक्लिओसिसची लक्षणे :
थकवा
घसा खवखवणे
ताप
मान आणि काखेत सुज
सुजलेले टॉन्सिल्स
डोकेदुखी
त्वचेवर पुरळ

साधारणपणे 13 ते 20 वर्षांच्या लोकांना त्रासदायक लक्षणांसह मोनो होण्याची शक्यता असते. तथापि, इतर वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला मोनोची लागण होऊ शकते, असं तज्ञ सांगतात. तुम्हाला या

आजाराची लक्षणं दिसल्यास किंवा आजार असल्यास शारीरिक संबंध ठेवणं टाळायला हवं. याशिवाय, कमीत कमी काही दिवस तुमचा ताप उतरेपर्यंत तुमचे अन्न, भांडी, ग्लास इतर कोणासोबतही शेअर करू नका.

व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपले हात नियमितपणे धुवायला हवेत. आपणच आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यायला हवी.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!