Wednesday, December 8, 2021

नगरकरांनी घाबरून जाऊ नये;अमरधाममध्ये जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील मयतांवरही अंत्यसंस्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्‍यामुळे नगर जिल्‍हयामध्‍ये मोठया प्रमाणात रूग्‍णसंख्‍या ही वाढत आहे. नगर शहर हे मुख्‍यालयाचे ठिकाण असल्‍यामुळे जिल्‍हयासह बीड

जिल्‍हयातील अतिसंवेदनशिल कोरोना रूग्‍ण उपचार घेण्‍यासाठी नगर शहरामध्‍ये येत असतात. दुदैवाने काहींचा मृत्‍यू होत आहे. त्‍यामुळे कोरोना रूग्‍णावर नगर शहरामध्‍ये अंत्‍यविधी होत असल्‍यामुळे शहरातील नागरिकांमध्‍ये भितीचे

वातावरण पसरले आहे. तरी शहरातील नागरिकांनी घाबरून जावू नये. कोरोना रूग्‍णांची अंत्‍यविधी करणे आपले कर्तव्‍य आहे या मानव भावनेतून आपण केडगांव अमरधाम, रेल्‍वे स्‍टेशन अमरधाम , नागापूर अमरधाम येथे सुविधा उपलब्‍ध

करून देणार असल्‍याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले..बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, शहरातील नालेगांव अमरधाम स्‍मशानभूमीमध्‍ये दररोज मोठया प्रमाणात कोरोना बाधीत रूग्‍णांचे अंत्‍यविधी होत असल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये घबराट पसरलेली आहे.

कोरोना मृत्‍यू झालेल्‍या नागरिकांच्‍या अंत्‍यविधीसाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. रूग्‍णवाहिकांच्‍या लागलेल्‍या रांगाचा फोटो ,व्हिडीओ सोशल मिडीयावर व्‍हायरल झाल्‍यामुळे नगर शहरामध्‍ये कोरोनामुळे होणा-या मृत्‍यूचे तांडव नागरिकांमध्‍ये जावून नागरिक भयभित होत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर पाहणी करून अंत्‍यविधी करण्‍यासाठी नेमणूक केलेल्‍या संस्‍थेच्‍या संचालकाशी चर्चा करून माहिती घेतली. यामध्‍ये मोठया प्रमाणात वयोवृध्‍द नागरिकांचा दुदैवी मृत्‍यू झाला आहे. याच बरोबर जिल्‍हयासह इतर जिल्‍हयातील कोरोना रूग्‍णांचा समावेश आहे. यासाठी प्रत्‍येक नागरिकांनी आपआपली काळजी घेणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!