Wednesday, December 8, 2021

बोठेला मदत करणार्‍या चौकशीतून आणखी तीन नावे समोर?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ ज. बोठे याला मदत करणार्‍या नऊजणांची चौकशी पोलिसांनी पूर्ण केली आहे. या नऊजणांच्या चौकशीमध्ये

त्यांच्याकडून बोठेला मदत करणार्‍यांमधील अन्य काही नावे स्पष्ट झाल्याने त्यांचीही आता पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. यामध्ये तीन नाने असून, यातील एकजण वैद्यकीय क्षेत्रातील व इतर दोन प्रतिष्ठित व्यक्तीचाही समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी बोठे याला अटक केल्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया होऊन तो आता न्यायालयीन कोठडीत पारनेर पोलिसांच्या कारागृहात आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु ठेवला आहे.

पोलिस आता बोठे फरार असतानाच्या काळात त्याला मदत करणारे तसेच विविध कारणाने त्याच्याशी संबंधित असलेल्यांना बोलावून चौकशी करीत आहेत. मागील आठवड्यात चार जणांची अशी चौकशी झाली होती व आता दोन दिवसांपूर्वी उर्वरित पाच जणांची चौकशी करण्यात आली आहे.

आतापर्यंत पोलिसांनी नऊजणांची चौकशी केली आहे व त्यांच्या चौकशीमध्ये अन्य काही नावेसुद्धा पुढे आली आहेत. यामध्ये एक वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे समजते तसेच अन्य दोन प्रतिष्ठित व्यक्तींचासुद्धा यामध्ये समावेश आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!